मालमत्ता कर न भरल्यामुळे मुरबाड रोड वरील “ए ॲण्ड जी” हॉस्पिटलची ॲडमीन रुम सिल
डोंबिवली महापालिकेच्या ४/जे प्रभागाची कडक कारवाई.
डोंबिवली, दि. २६ फेब्रुवारी – कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोडवर असलेल्या भारत एम सूचक संचलित “ए ॲण्ड जी” मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चा मिळकत क्र. B०२०१२३३८६०१, नुसार हॉस्पिटलने मालमत्ता कराची एकूण पंचाहत्तर लाख, सत्तेचाळीस हजार, पंचवीस रुपये, (७५,४७,०२५)/- एव्हढ्या रक्कमेचा भरणा न केल्यामुळे पालिकेच्या प्रभाग ४/जे च्या सहाय्यक आयुक्त सविता हिले व त्यांच्या पथका- कडून हॉस्पीटलची ॲडमीन रुम सिल करण्याची धडक कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या प्रभागात कर वसुलीची मोहिम अधिकाधीक तीव्र करण्यात येत आहे. कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर या पुढेही अशी कारवाई केली जाईल. तरी महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपला कराचा भरणा विहित मुदतीत करावा असे आवाहन महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागामार्फत करण्यात येत आहे .
