मुंबई : राष्ट्रवादी पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. राष्ट्रीय अध्यक्षपदावर प्रफुल्ल पटेल दावा करणार अशी चर्चा सुरु झाली असतानाच आज पक्षाच्या विशेष राष्ट्रीय अधिवेशनात स्वता प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदी सुचविले. आणि सर्वानुमते हात उंचावून त्याला अनुमोदन देण्यात आले.

मराठमोळ्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष कुणीही चालतील पण तो पटेल नको अशी जाहीर टिप्पणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यामुळे या वादाला सुरुवात झाली होती. या पार्श्वभुमीवर पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा प्रस्ताव मांडला, त्या सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली.

या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीस राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, पार्थ पवार, रुपाली चाकणकर छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *