जिल्हा कॅरम स्पर्धा
सिद्धांत – मितालीला प्रथम मानांकन
मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने पी एम बाथ बोट क्लब ट्रस्ट आयोजित मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा शनिवार दिनांक २८ फेब्रुवारीला सकाळी पुरुष एकेरी गटाने सुरु होत आहे. एकंदर १३० खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला असून पुरुष एकेरी गटात डी के से सी च्या सिद्धांत वाडवलकरला तर महिला एकेरी गटात जैन इरिगेशनच्या मिताली पाठकला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. पहिल्या दिवशी एकंदर सात सत्रात सामने खेळविण्यात येणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे १ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील मानांकन पुढील प्रमाणे.
पुरुष एकेरी : १) सिद्धांत वाडवलकर ( डी. के.  सी सी ) २) नीरज कांबळे ( डी के सी सी ) ३) विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ) ४) गिरीश तांबे ( मुंबई महानगरपालिका ) ५) हरेश्वर बेतवंशी ( ए के फाऊंडेशन ) ६) सौरभ मते ( डी के सी सी ), ७) शेख महम्मद रझा ( ए के फाऊंडेशन ) ८) नीलांश चिपळूणकर ( ए के फाऊंडेशन )
महिला एकेरी : १) मिताली पथक( जैन इरिगेशन ), २) सोनाली कुमारी ( ए के फाऊंडेशन ), ३) ऐशा साजिद खान ( जैन इरिगेशन ) ४) अंजली सिरीपुरम ( भारतीय आयुर्विमा महामंडळ )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *