दहिसर येथील पूर्ण प्रज्ञाचे मराठी पाऊल पडते पुढे
माध्यमिक शाळेच्या प्रांगणात मराठी दिनाचा प्रचंड उत्साह
मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने दहिसर येथील पूर्णप्रज्ञा माध्यमिक शाळेत विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषेच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांनी मराठी कवितांचे सुंदर सादरीकरण केले. काही विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे प्रभावी वाचन करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच मराठी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा आणि इतिहास यावर भाषणेही झाली. विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, कविता वाचन आणि हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला. शाळेच्या प्रांगणात मराठी सुविचार व घोषवाक्यांनी सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण वातावरण मराठीमय झाले होते. मुख्याध्यापकांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे आणि दैनंदिन जीवनात मराठीचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी साहित्य वाचनाची सवय लावण्याचा सल्लाही दिला.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनात मराठी भाषेबद्दल आदर, प्रेम आणि अभिमान निर्माण करणारा ठरला. पूर्ण प्रज्ञा हायस्कूलमध्ये साजरा झालेला मराठी दिन सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.
