नूरबाग शिधावाटप कार्यालयात मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात संपन्न
मुंबई : जेजे रुग्णालयाजवळच असलेल्या नूरबाग शिधावाटप कार्यालयात मराठी भाषा दिन आणि कवीवर्य कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना आपण अत्यंत आदराने ‘कुसुमाग्रज’ म्हणतो, याच नावाने ओळखतो त्यांची आज जयंती असून त्यांच्या जयंतीनिमित्त हा मराठी भाषा दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. मराठी साहित्यातील कुसुमाग्रज यांचे अतुलनीय योगदान आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी त्यांनी आयुष्यभर केलेले कार्य यांचा गौरव आपण मराठीजनच नव्हे तर मराठी भाषेवर प्रेम करणारे जगातील सर्वच लोक मोठया आनंदात अभिमानाने साजरा करतात असे उदगार सहाय्यक शिधावाटप अधिकारी भूपेंद्र गवळी यांनी काढले.यावेळी त्यांच्यासोबत रेशनिंग इन्स्पेक्टर विकास उभे,अनिकेत जावळकर,रेशनिंग इन्स्पेक्टर ज्ञानेश पवार, लिपिक आशिष राऊत यांच्यासह स्थानिक मराठी भाषिक संतोष पाटील, सागर शेडगे आणि अन्य लोकं उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *