किडनी पेशंटला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मदत
कल्याण: कल्याणमधील किडनी पेशन्टला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रामबाग शाखेतर्फे रूपये ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली. शिवसेना रामबाग शाखेचे निष्ठावंत शिवसैनिक व ओम कबड्डी संघाचे खेळाडू मंगेश नेटावटे यांना किडनीचा मोठा आजार झाला. त्यांना आता डायलीसच्या मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागणार आहे. त्यांना मीरा हॉस्पिटल मध्ये पंधरा दिवस उपचार घ्यावे लागले, मीरा हॉस्पिटल ने त्यांना बिल कमी करून भरपुर सहकार्य केले. त्यांचा डायलीसीसच्या मोठ्या खर्चाचा विचार करून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी मार्गदर्शनाखाली रामबाग शाखेने तसेच शिवजयंती उत्सवात तर्फे रू.५० हजरांचा धनादेश देऊन सहकार्य केले.
