स्पर्श फाउंडेशन आयोजित स्वर्गीय सामानाधिकारी यांच्या स्मरणार्थ कबड्डी स्पर्धा – २०२६.
मुंबई :- भैरवनाथ मंडळाने स्पर्श फाउंडेशनने आयोजित केलेल्या तृतीय श्रेणी पुरुषात विजेतेपद पटकाविले. १४ वर्षा खालील गटात हा मान गुड मॉर्निग स्पोर्टस् ने मिळविला. लोअर परेल येथील मॅरोथान मैदान येथे संपन्न झालेल्या तृतीय श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात भैरवनाथ मंडळाने श्री दत्त मंडळावर ३२-०६ अशी सहज मात करीत रोख रक्कम व “स्वर्गीय सामनाधिकारी चषकावर” आपले नाव कोरले. आक्रमक खेळ करीत लोण देत भैरवनाथने विश्रांतीला १५-०५ अशी भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या डावात त्याच तडफने खेळ करीत श्री दत्तला पुरते नामोहरण केले. तन्वय कदम, सतीश जाधव यांच्या चढाई पकडीच्या झंझावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. श्री दत्तचा शिवम रायभान बरा खेळला. १४वर्षाखालील गटाच्या अंतिम सामन्यात गुड मॉर्निंग स्पोर्टस् ने सार्थ बागडे, शिव शर्मा, श्रेयस यादव यांच्या चतुरस्त्र खेळाने श्री संस्कृती मंडळावर ४७-२८ अशी मात करीत “स्वर्गीय सामनाधिकारी चषक” मिळविला. संस्कृतीचा सचिन तिवारीने एकाकी लढत दिली.
भैरनाथचा तन्मय कदम ठरला तृतीय श्रेणी गटातील स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू. सतीश जाधव(भैरवनाथ), शिवम रायभान(श्री दत्त) ठरले स्पर्धेतील उत्कृष्ट पकड व चढाईचे खेळाडू ठरले. या सर्वांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. १४ वर्षाखालील गटात गुड मॉर्निंगचा सार्थक बागडे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. शिव शर्मा(गुड मॉर्निग), सचिन तिवारी(संस्कृती) ठरले स्पर्धेतील उत्कृष्ट पकड व चढाईचे खेळाडू ठरले. सर्वांना चषक देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *