युद्ध चिघळले ० अयातुल्ला अराफी इराणचे नवे सर्वोच्च नेते० इराण बदला घेणार ० अमेरिकेच्या २७ लष्करी तळांवर हल्ले ० इराणमध्ये ४०दिवसांचा राष्टीय दुखावटा ० इस्त्रलायलमध्ये हायअर्लट

तेहरान : अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाले आणि अवघं जग हादरले. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने आणखी आक्रमक होत इस्त्रायल आणि अमेरिकेच्या २७ हवाई तळांवर प्रतिहल्ले केले आहेत. अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर काही तासांतच इराणने अयातुल्ला अराफी यांची इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती केली आहे. धर्मगुरू खामेनी यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्याचा इराणला अधिकार असून बदला घेतला जाणारच असे नवे सर्वोच्च नेते अराफी यांनी जाहीर केले. यामुळे अमेरिका आणि इस्त्रालायमध्ये हायअर्लट जारी करण्यात आला आहे.

“इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राजकीय अधिकार्‍याची आणि जगभरातील शिया धर्माच्या एका प्रमुख नेत्याची हत्या, ही मुस्लिमांविरुद्ध आणि विशेषतः जगभरातील शिया मुस्लिमांविरुद्ध उघडपणे युद्धाची घोषणा मानली जाते”, असं मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलं आहे.

अमेरीका आणि इस्रायलने खामेनी यांच्या कार्यालयावर सुमारे ३० क्षेपणास्त्रे डागली, ज्यामध्ये खामेनी आणि ४० कमांडर ठार झाले. या हल्ल्यात खामेनी यांची मुलगी, जावई, नात आणि सून यांचाही मृत्यू झाला. इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानसह १० प्रमुख शहरांना लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत २५० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि ७४० हून अधिक जखमी झाले आहेत. एका शाळेवर क्षेपणास्त्र हल्ला झाला, ज्यामध्ये १४८ विद्यार्थिनी मृत्युमुखी पडल्या आणि ४५ जण जखमी झाले. दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर हल्ले सुरूच आहेत आणि इराण प्रत्येक हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत आहे.

चौकट १

अमेरिकेच्या पाकमधील

दुतावासावर हल्ला ;

१४ आंदोलनकर्ते ठार

कराची : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमधील कराचीमध्ये अमेरिकेच्या दुतावासवर शिया मुसलमान आंदोलनकर्त्यीं हल्ला केला. आंदोलनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनली. काही आंदोलनकर्त्यांनी यूएस कॉन्सुलेटच्या परिसरात घुसून तेथे तोडफोड केली. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाल्याची माहिती आहे.

चौकट २

पुण्यातील ८० विद्यार्थी

दुबईमध्ये अडकले

पुणे : पुण्यातील नामांकित विद्यालयाचे ८४ जणं दुबईमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ८४ जणांमध्ये ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षकांचा समावेश आहे. शैक्षणिक सहलीसाठी हे सारे जण दुबईत गेले होते. परराष्ट्र मंत्रालयाकडून पुण्यातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून सुद्धा विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाविद्यालयाचे डीन जनार्दन पवार, यांनी ही माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *