महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
कल्याण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जीवनदीप कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जीवनदीप फाउंडेशन आणि जीवनदीप वार्ता यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, दि. ८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता “महिला सन्मान मॅरेथॉन”चे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या आरोग्यजागृतीसाठी, आत्मविश्वास वृद्धीसाठी व त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. परिसरातील सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिटवाळा येथील पद्मावती रॉयल सोसायटी येथून या मॅरेथॉनची सुरवात होणार असून ३ कि.मी. अंतर पार करून घोटसाई गाव प्रवेशद्वार येथे सांगता होईल. यामध्ये १८ ते ३० वर्षे व ३० वर्षांवरील महिला सहभागी होऊ शकतात मात्र नाव नोंदणी अनिवार्य आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून सर्व सहभागी महिलांना टी-शर्ट व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 91६7५६341२, 9५६13६3133
००००००
