दहिसर येथील पूर्णप्रज्ञा शाळेत विज्ञान दिन उत्साहात साजरा
अनेक नवनवीन प्रकल्पांचे प्रदर्शन
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : दहिसर येथील पूर्णप्रज्ञा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ . चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या रमन परिणामाच्या शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. पूर्णप्रज्ञा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात विविध प्रकल्प सादर केले. प्रश्नमंजुषा स्पर्धा व मार्गदर्शनपर भाषणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेतील प्राचार्यांपासून सर्व शिक्षक अधिकारी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
