पुणे : ‘स्वभावाला औषध असते’च्या लेखिका आणि

प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि बालकारणी डॉ. श्यामला वनारसे यांचे पुण्यात अल्प आजाराने निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने साहित्य, सांस्कृतिक आणि मानसशास्त्र क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

डॉ. श्यामला वनारसे यांनी साहित्य, संगीत, नृत्य, सिनेमा, बालकारण आणि मानसशास्त्र अशा विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले असून अनेक पुस्तके आणि लेख त्यांच्या नावावर आहेत.

पती दिवंगत डॉ. सुधीर वनारसे यांच्या समवेत डॉ. श्यामला वनारसे यांनी औद्योगिक मानसशास्त्र या विषयावर व्यापक काम केले. अनेक उद्योगसंस्थांबरोबर त्यांनी मानवी संसाधन विकास आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने काम केले. कार्यक्षमता वाढ, संघटनात्मक वर्तन आणि नेतृत्व विकास या क्षेत्रांत त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते.

डॉ. श्यामला वनारसे आणि डॉ. सुधीर वनारसे यांनी एकत्र लिहिलेल्या ‘स्वभावाला औषध असते’ या पुस्तकाला राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच ‘सत्यजित राय’ आणि ‘भारतीय मन्वंतर’ या पुस्तकांनाही राज्य पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *