पीएम बाथ कॅरम स्पर्धा
मुंबई: जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने पी. एम हिंदू स्विमिंग बाथ अँड बोट क्लब, चर्नी रोड येथे सुरु असलेल्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या उपउपांत्य लढतीत मुंबई महानगरपालिकेच्या भरत कोळीने ओ एन जी सी च्या संदीप देवरूखकरला १९-२१, २५-९ व २५-६ असे हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या उपउपांत्य लढतीत ए के फाऊंडेशनच्या नीलांश चिपळूणकरने डीकेसीसीच्या सिद्धांत वाडवलकरवर तीन सेटपर्यंत चालेल्या रंगतदार लढतीत १४-२०, २१-१६, २५-१६ अशी मात करून आपले उपांत्य सामन्यातील स्थान पक्के केले.
पुरुष एकेरी उपउपांत्य फेरीचे इतर निकाल पुढील प्रमाणे.
महम्मद घुफ्रान ( इंडियन ऑइल ) वि वि सलमान खान ( शिवतारा सी सी ) २४-१२, २५-६
विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ) वि वि दिलेस खेडेकर ( पी डी सी ए) २५-१५, २५-८
महिला एकेरी उपउपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे-
मिताली पाठक ( जैन इरिगेशन ) वि वि नेहा कुमारी ( पी ओ आर सी ) २५-१, २५-०
अंजली सिरीपुरम ( भारतीय आयुर्विमा महामंडळ ) वि वि रोझिना गोदाद ( म का. क. मंडळ ) २५-०, २५-१० ऐशा साजिद खान ( जैन इर्रीगेशन ) वि वि गौरी सावंत ( ए के एफ ) २५-०, २५-०
सोनाली कुमारी ( ए के एफ ) वि वि शैला जाधव ( भारतीय अयुतविमा महामंडळ ) २५-०, २५-०
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *