आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ समाजसेविका स्व. मंगलाताई अडसूळ स्मृती चषक ८/११/१४ वर्षाखालील  मुलामुलींच्या स्वतंत्र एकूण ६ वयोगटामध्ये जलद बुध्दिबळ स्पर्धा ७ मार्च रोजी दुपारी २ वाजता आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक वयोगटात २० बक्षिसे असून एकूण १२० पुरस्कार दिले जाणार आहेत. को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना यांच्या सहकार्याने ही स्पर्धा स्विस लीग पध्दतीच्या किमान ४ फेऱ्यांमध्ये रंगणार आहे. प्रत्येक साखळी फेरी १५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे स्पर्धकांना बुध्दिबळ पट व घड्याळ दिली जाणार आहेत. प्रत्येक गटातील प्रथम पुरस्कार विजेत्या स्पर्धकांच्या मातांचा देखील सन्मान होणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक प्रमोद पार्टे अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (९३२४७ १९२९९) यांच्याकडे व्हॉटसअॅपवर ३ मार्चपर्यंत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *