कल्याणमध्ये “रण रागिणी मॅरेथॉन स्पर्धेचे” आयोजन

कल्याण : रविवार दि.8 मार्च रोजी महिला दिनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण रनर्स ग्रुप आणि वैष्णवी मॅटर्निटी होम यांच्या संयुक्त विद्यमाने “रण रागिणी मॅरेथॉन स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे.

हि मॅरेथॉन स्पर्धा तीन गटात संपन्न होणार आहे. यामध्ये (अ) सकाळी 6 वा. 10 कि.मी. मॅरेथॉन स्पर्धा,  (ब) सकाळी 7 वा. 5 कि.मी. मॅरेथॉन स्पर्धा आणि (क) सकाळी 7.45 वा. 3 कि.मी. मॅरेथॉन स्पर्धा संपन्न होईल. या तिन्ही स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट वेशभूषासाठी एक पारितोषिक, सर्वोत्तम थीम्ससाठी एक पारितोषिक, सर्वोत्तम ग्रुप थीमसाठी एक पारितोषिक आणि विजेत्यांसाठी एक, दोन, तीन अशी पारितोषिके राहतील. या मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग कल्याण पश्चिमेतील गांधारे ब्रीज मार्गे रिंग रोड हा राहील.

महानगरपालिकेतर्फे विद्युत, यांत्रिकी अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत व मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव या स्पर्धे करीता नोडल अधिकारी म्हणून काम पाहत असून, कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रातील आणि महापालिकेत कार्यरत असणाऱ्या जास्तीत जास्त महिलांनी “रण रागिणी मॅरेथॉन स्पर्धेत” सहभाग घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *