महापौर चषक’ बास्केटबॉल स्पर्धेत दहिसर येथील पूर्णप्रज्ञा उपविजेते
मुंबई : मोतीलाल नगर मनपा शाळा, गोरेगाव (पश्चिम), मुंबई येथे आयोजित ‘महापौर चषक’ बास्केटबॉल स्पर्धेत दहिसर येथील पूर्णप्रज्ञा माध्यमिक विद्यालयाच्या (१४ वर्षांखालील गट) संघाने उपविजेतेपद पटकावले आहे. त्यांच्या जिद्दीमुळे, उत्तम संघकार्यामुळे आणि खिलाडूवृत्तीमुळे आपल्या शाळेची मान अभिमानाने उंचावली आहे, अशी प्रतिक्रिया शाळेच्या मुख्याध्यापिकांनी व्यक्त केली असून उपविजेत्या संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
