माथेरान पाणीपट्टी अभय योजना लागू करावी

विरोधी पक्षनेते सिताराम कुंभार यांची मागणी

मुकुंद रांजणे

माथेरान : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महामंडळ यांच्या माथेरान पाणी पुरवठा योजनेला पाणी पुरवठा अभय योजना लागू करण्याबाबत नगराध्यक्ष यांनी  पुढाकार घेऊन संबंधित अधिकारी वर्गाकडे शिफारस करावी या आशयाचे निवेदन विरोधी पक्षनेते सिताराम कुंभार यांनी दि. ४ रोजी सादर केले आहे.

माथेरानचे नागरिक,लॉज धारक, हॉटेल्स व्यावसायिक,व्यापारी यांची मोठया प्रमाणावर पाणी बिलांची थकबाकी असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी वारंवार पाणी कनेक्शन कट करण्यासाठी तगादा लावत असतात.सध्या पर्यटन हंगाम खूपच मंदीचा असून पाणी बिलांवर मोठया प्रमाणात डीपीसी ( delayed pement charges ) आकारण्यात आले असून सदरचे डीपीसी शुल्क माफ होण्यासाठी नगराध्यक्षांनी स्थानिक आमदारांच्या माध्यमातून पाणी पुरवठा मंत्री यांच्याकडे पाणीपट्टी वरील डीपीसी रद्द होणेकामी अभय योजना लागू करण्याची शिफारस करावी जेणेकरून स्थानिकांची आर्थिक बचत होऊन समाधानाचे वातावरण निर्माण होईल असे विरोधी पक्षनेते सिताराम कुंभार यांनी निवेदनात नमूद केले आहे. यावर नगराध्यक्ष काय भूमिका घेतात याकडे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिकांचे लक्ष लागले आहे. सदर निवेदन सादर करताना नगरसेवक सचिन दाभेकर, किरण पेमारे, गिरीश पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *