स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनुयायी स्व. चंद्रकला पाठक यांना मरणोत्तर महर्षि दधिची सन्मान.

मुंबई :  अंबरनाथ येथील अध्यात्ममार्गी कृष्णाजी विश्वनाथ केतकर उपाख्य प्रसाद महाराज यांची सख्खी भाची आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कट्टर अनुयायी स्व. चंद्रकला पाठक यांनी केलेल्या देहदानाबद्दल केंद्रीय मंत्रालयातर्फे इंदुर येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार सोहळ्यात स्व. श्रीमती चंद्रकला पाठक यांना   ‘महर्षि दधिची सन्मान’ हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. स्व. श्रीमती चंद्रकला पाठक यांचे चिरंजीव अभय पाठक आणि स्नुषा सौ. विद्या अभय पाठक यांना केंदीय  वाहतुक मंत्री हर्षवर्धन मल्होत्रा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.  देहदान केलेल्यांचा मध्य प्रदेश सरकारतर्फे सन्मान करण्यात येतो. पुरस्कार सन्मानित व्यक्तींना ‘गार्ड ऑफ ऑनर देण्यात येतो. देहदान हेच मोठे सामाजिक कार्य आहे हा कार्यक्रम गेल्या २१ वर्षांपासून सुरू आहे पण ह्यावर्षी केंद्र सरकारने दखल घेतली व केंद्रीय मंत्री हर्षवर्धन मल्होत्रा आले होते.  ते खरे तर परिवहन मंत्री आहेत पण ह्या विभागाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्यांच्या शुभहस्ते हा सन्मान करण्यात आला.  केंद्राचा हातभारही असतो.  विरार येथील आगाशी येथे श्री कृष्णाजी विश्वनाथ केतकर हे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी चाळपेठ रोड, आगाशी येथील केतकर वाड्यास भेटही दिली होती. कृष्णाजी विश्वनाथ केतकर यांच्या भगिनी असलेल्या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्या यमुनाबाई  ओक यांच्या चंद्रकला ओक या कन्या. विवाहानंतर त्या चंद्रकला चंद्रकांत पाठक झाल्या. आजोळी आगाशी येथे शालेय शिक्षण  झाल्यावर  आईवडिलांकडे रहावयास गेल्या. वडील  व  पती रेल्वेत  नोकरी   करीत असल्याने  नंतर कायम मध्य प्रदेश  व उत्तर  प्रदेशात  वास्तव्य  होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *