सीसीआय स्नूकर
पंकज अडवाणी सलग चौथ्या जेतेपदासाठी सज्ज
मुंबई- राष्ट्रीय विजेता आणि २७ वेळा आयबीएसएफ विश्वविजेता पंकज अडवाणी हा ६ मार्चपासून आयकॉनिक क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू होणाऱ्या प्रतिष्ठित सीसीआय स्नूकर क्लासिक २०२६ मध्ये आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी उत्सुक आहे.
गेल्या तीन आवृत्त्यांमध्ये विजेता ठरलेल्या बेंगळुरूच्या स्टार क्यूइस्टने सीसीआयमध्ये होणाऱ्या स्पर्धेत सलग चौथा मुकुट जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पंकजसमोर माजी राष्ट्रीय विजेता मुंबईचा आदित्य मेहताचे मोठे आव्हान असेल. जानेवारीमध्ये हरियाणा येथे झालेल्या ९२ व्या राष्ट्रीय स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंकजने त्याला पराभूत केले होते.इतर स्पर्धकांमध्ये ब्रिजेश दमानी, क्रिश गुरबक्षनी आणि साहिल नय्यर, माजी राष्ट्रीय विजेता सौरव कोठारी, एस. श्रीकृष्ण आणि लक्ष्मण रावत यांचा समावेश आहे. सीसीआय स्नूकरमध्ये एकूण १३.५ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून विजेत्याला ३.५ लाख तर उपविजेत्याला १.७५ लाख रुपये मिळतील.
