आश्वासनावर किती वेळा उपोषण करायचे !

राज्यातील मातंग समाजाचा सरकारला सवाल

रमेश औताडे

मुंबई : राज्यातील मातंग समाज आज अनेक मूलभूत सोयी सुविधा पासून वंचित आहे. सरकारने या समाजाची कायमची उपेक्षा केली आहे. वेळोवेळी आंदोलने मोर्चे काढून न्याय मागण्यात अनेक पिढ्या संपल्या तरी सरकार मात्र या समाजाकडे व त्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे गांभीर्याने विचार करत नाही. आंदोलन मोर्चे झाले की सरकार फक्त आश्वासन देते. या समाजाने आश्वासनावर किती वर्ष राहायचे असा सवाल आझाद मैदानात मातंग समाजाने उपोषणादरम्यान केला आहे.

मागासवर्गीय वंचित संघ आणि राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटना यांच्या वतीने मोहनराव कांबळे यांच्या नेतृत्वात आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणास मातंग समाज मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहे. मातंग समाजाचे प्रतिनिधी प्रकाश चव्हाण, राजीव मानकर, अनिल साठे यांनी  सक्रिय पाठिंबा देत उपोषणात सहभागी झाले आहेत.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाठ यांनी संघटनेच्या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत भेट दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा प्रश्न, बाधित स्थानिकांचे आहे तिथेच पुनर्वसन,  लहुजी नगर शेगाव पुनर्वसन या व इतर मागण्या संदर्भात येत्या आठ दिवसात निर्णय घेतो असे सांगितले.  परंतु संघटनेचे समाधान न झाल्याने आरक्षण वर्गीकरण प्रश्न व इतर मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *