शंकरराव चौकात बसविलेल्या मोबाईल टॉवरची चौकशी करण्याची भाजपाची मागणी

भाजपा कल्याण शहर सरचिटणीस प्रशांत माळी यांचे महापौरांसह आयुक्तांना पत्र

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील शंकरराव चौक येथे बसविण्यात आलेल्या मोबाईल नेटवर्क टॉवरमुळे कॅन्सरचा धोका वाढला असून नागरिकांसह पशु, पक्षी यांनाही धोका निर्माण झाला असून त्याबाबत भाजपा कल्याण शहर सरचिटणीस प्रशांत माळी यांनी केडीएमसी महापौर आणि आयुक्तांना तक्रार केली असून या मोबाईल टॉवरची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका ह‌द्दीतील प्रभाग क्रमांक ८ मधील शंकरराव चौक येथे अलीकडेच मोबाईल नेटवर्क टॉवर बसविण्यात आलेला आहे सदर टॉवर हा अतिशय गर्दीच्या व संवेदनशील ठिकाणी बसविण्यात आलेला असून त्याच्या अगदी शेजारी शाळा, मुख्य रस्ता तसेच महानगरपालिकेचे गुख्यालय आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात वि‌द्यार्थी, नागरिक व वाहनांची सतत ये-जा असते. या टॉवरमुळे परिसरातील नागरिक, वि‌द्यार्थी व व्यावसायिक त्रास व संभाव्य धोके निर्माण होत आहेत.

शाळेतील लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. गर्दीच्या मुख्य रस्त्यालगत टॉवर असल्यामुळे भविष्यात अपघात किंवा इतर सुरक्षा धोके संभवतात. टॉवर बसविताना महानगरपालिकेची आवश्यक परवानगी, स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र, फायर एनओसी तसेच दूरसंचार विभागाची परवानगी घेण्यात आली आहे की नाही याबाबत नागरिकामध्ये शका निर्माण झाली आहे. या टॉवरमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थता निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

त्यामुळेहाटॉवरबसविण्यासाठीमहानगरपालिकेचीवैधपरवानगीघेतलीआहेका, स्ट्रक्चरलस्थिरताप्रमाणपत्र, अग्निसुरक्षानाहरकतप्रमाणपत्रउपलब्धआहेका, दूरसंचारविभागाच्यानियमांचेपालनकरण्यातआलेआहेका, हाटॉवरनागरिकांच्याववि‌द्यार्थ्यांच्यासुरक्षिततेसधोकानिर्माणकरीतअसल्यासतोतात्काळहटविण्यातयावा. हिबाबनागरिकांच्याआरोग्यवसुरक्षेशीसंबंधितअत्यंतगंभीरबाबअसल्यानेयाचीतात्काळदखलघेऊनयोग्यतीकार्यवाहीकरण्याचीमागणीप्रशांतमाळीयांनीकेलीआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *