सीसीआय स्नूकर क्लासिक स्पर्धा
ऋतुराज, आशीष, झेनुलचे चुरशीच्या लढतीत विजय
मुंबई, ८ मार्च: सीसीआय स्नूकर क्लासिक २०२६ स्पर्धेत पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज कर्नाड, आशीष गोरे आणि झेनुल अर्सिवालाने चुरशीच्या लढतीत विजय मिळवले. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत ऋतुराजने नौजद मुन्शीचा ३-२(५२-७१, ६७-३१, ६६-२८, ४४-५९, ५५-१७) असा पराभव केला. अन्य सामन्यात, आशीषने प्रदीप जाधववर ३-२ (५७-५२, १३-५३, ६१-४४, १५-५8, ४8-४४) त्याच फरकाने विजय मिळवला. झेनुल अर्सिवालाने प्रसाद वानखेडकरला ३-१ असे हरविले.
निकाल (पहिली फेरी): झेनुल अर्सिवाला विजयी वि. प्रसाद वानखेडकर ३-१ (२२-६४, ५४-३६. ५२-११, ६१-११); इमदाद खान विजयी वि. मिथुन मर्चंट ३-० (५७-१३, ५०-४०, ५३-९); एजाज मर्चंट विजयी वि. मनन शाह ३-१ (५२-३९, ६६-१, ३२-७४, ७२-३४).
