महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थीनींचे समुपदेशन

कल्याण : महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे कल्याणमधील अचिव्हर्स महाविद्यालयातील विद्यार्थीनीसाठी समुपदेशन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाध्ये विद्यार्थिनींना, आत्मविश्वास आणि स्व-ओळख, किशोरावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळीबद्दल योग्य माहिती व स्वच्छता, सुरक्षितता व स्वतःचे संरक्षण,चांगला स्पर्श – वाईट स्पर्श, ऑनलाइन सुरक्षितता, ‘नाही’ म्हणण्याचे धाडस, शिक्षणाचे महत्त्व व करिअर स्वप्ने, डिजिटल जगात जबाबदारी, सोशल मीडिया वापराचे फायदे-तोटे, सायबर बुलिंग ओळखणे, ड्रग व त्याचे दुष्परिणाम अशा विविध विषयांवर मानसशास्त्रज्ञ प्रोजेक्ट डायरेक्टर आरती बनसोडे यांनी सुंदर प्रकारे मार्गदर्शन केले .

यावेळी समाज विकास विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड, समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर, वूमन्स वेलफेअर फाऊंडेशनच्या संचालिका मिनाक्षी उज्जैनकर, अचिव्हर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.  महेश भिवंडीकर, रेखा भिवंडीकर, सना खान, सिद्धी चव्हाण,वूमन्स वेलफेअर फाऊंडेशन टीम विनिता माने, स्वाती डोलारे, कृतीका मोरे, रुतीका दामले, अमृता गायकवाड, ज्योत्स्ना हांडे, हर्षिला नरवडे, वैष्णवी लोखंडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *