महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली नाकाबंदी
कल्याण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन अंतर्गत कल्याण रेल्वे स्टेशन व परिसरात पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशान्वये व सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनात फक्त महिला अधिकारी व अंमलदार यांनी नाकाबंदी करत वाहतूक विभागासह सयुक्त कारवाई केली. या नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी करून चलान देण्यात आले. तसेच स्टेशन परिसरात पायी पेट्रोलिंग केली. स्कायवाक पेट्रोलिंग, दरम्यान केडीएमसी अतिक्रमण विभागाच्या मदतीने अतिक्रमण हटवण्यात आले. यावेळी विविध कलमान्वये एकूण १०३ कारवाया करण्यात आल्या. या कारवाई दरम्यान ४ महिला अधिकारी व ३२ महिला पोलीस अमलदार हजर होते.
