श्री अमृतेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न

रायगड- रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात देवघर गावात स्वयंभू श्री अमृतेश्वराचे प्राचीन, सुबक मंदिर आहे. नुकत्याच  होळी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ,ज्येष्ठ, महिला मंडळ आणि युवा तरुण मंडळ (मुंबई) यांच्या सर्वांच्या सहकार्याने श्री अमृतेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने  संपन्न झाला.देवाचे परमभक्त व ग्रामस्थ संदेश महामुणकर व विराज महामुणकर सांगतात की, देवघर या गावाचा उंबरठा फक्त ३३ घरांचा आहे तरी  येथील प्रत्येक कार्यक्रम हा हौसेने, उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने  गावचे ग्रामस्थ, महिला तसेच तरुण मंडळी पार पाडत असतात.या कार्यक्रमाच्या दिवशी गावातील प्रत्येक ग्रामस्थ आणि मुंबईवरून आलेले चाकरमानी  आपल्या कामातून थोडी उसंत काढून या उत्सवात सहभागी होत असतात. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन सुद्धा ग्रामस्थ व महिला मंडळ देवघर आणि युवा तरुण मंडळ (मुंबई) हे एकत्रित येऊन करत असतात. हर हर महादेव व जय बोला जय बोला श्री अमृतेश्वर महाराज की जय या गजरात ते ह्या कार्यक्रमाची सुरुवात करतात.

सदर पालखी सोहळ्याला उपस्थित ग्रामस्थ, वरिष्ठ आणि महिला मंडळ, लहान मुले तसेच युवा तरुण मंडळ मुंबईचे उपस्थित कार्यकर्ते विराज महामुणकर, संदेश महामुणकर, संकेत महामुणकर, ऋषिकेश भुवड, सुरज महामुणकर, संकल्प सुर्वे,राहुल शिगवण, समिर भुवड, दीपेश कदम,नीरज महामुणकर, सोहम महामुणकर, धनराज विचारे,स्वप्निल भुवड,सौरभ कदम, विकेश कदम, सनराज शिर्के, अनिकेत शिर्के,अभिषेक महामुणकर,कुणाल शिंदे, शुभम शिर्के,साहिल शिर्के,संकेत महामुणकर, राज महामुणकर. (इंस्टाग्राम नियोजक कुशल महामुणकर व प्रज्वल महामुणकर. देवघर गावचा इंस्टाग्राम आयडी या सर्वांच्या साक्षीने हा सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *