तेहराण इराणच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांना थेट धमकी दिली आहे. “ट्रम्प यांनी सावध राहावे, अन्यथा ते स्वतःच संपून जातील,” अशी धमकी संबंधित इराणी अधिकाऱ्याने दिली आहे. या युद्धामुळे खाडी देशांत प्रचंड तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेने हल्ले सुरूच ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे इराणने स्पष्ट केले आहे.

डोनल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इराणविरुद्धचे युद्ध अल्पकाळासाठी असू शकते, असे विधान केले होते. मात्र, इराणने जागतिक तेल पुरवठ्यात अडथळा आणल्यास ही लढाई अधिक तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. “होर्मुझ सामुद्रधुनीतील तेल पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केल्यास, अमेरिका आताच्या तुलनेत वीस पट अधिक तीव्र हल्ला करेल,” असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *