ना दरवाढ, ना करवाढ असललेला अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर

मिरा -भाईंदर : महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी आज स्थायी समितीसमोर वर्षं २०२५-२६ चा सुधारीत आणि सन २०२६-२७ चा मूळ अर्थसंकल्प मांडला.  कोणतीही दरवाढ आणि करवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी त्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलं. स्वच्छ सर्वेक्षणात मिळालेल्या देशात प्रथम स्थानानंतर आता आमचे ध्येय ‘ स्वच्छ शहरातून शाश्वत शहराकडे ’ असल्याचं ते पुढे म्हणाले. आर्थिक शिस्त,  पायाभूत सुविधा आणि भविष्यासाठी तरतूद या तीन गीष्टींवर विचार करून त्यावर आधारित हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

करवसुली वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न, बायो मायनिंग,  घनकचरा व्यवस्थापन, सोलर व्यवस्था तसेच डिजिटल व्यवस्था वाढविण्यावर भर देणार असल्याचे आयुक्तानी सांगितले. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी एकूण १४३९.०२ कोटीचे अर्थसंकल्पीय अंदाज त्यांनी स्थायी समिती समोर सादर केले. या समितीच्या पुढील बैठीकीत यावर निर्णय होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *