उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महिलांना गिफ्ट
मुंबई : जागतिक महिला दिन ८ मार्चला साजरा झाला याचे औचित्य साधून आज विधिमंडळ अधिवेशनात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना मोठी गिफ्ट झाली. लवकर या आणि लवकर जाण्याची सुट महीलांना आज सुनेत्रा पवारांनी दिली.
शासकीय नोकरीत असलेल्या महिला सकाळी ९.१५ वाजता कार्यालयात आल्या तर घरी जाताना त्यांना अर्धा तास लवकर सोडण्यात येईल, अशी घोषणा सुनेत्रा पवार यांनी विधानपरिषदेतून केली.
सरकारने लाडकी बहीण, लेक लाडकी, अन्नपूर्णा सारख्या योजना आणल्या आहेत. मेट्रोमनी साईड वरून होणारी फसवणूक रोखण्यासाठी देखील कायदा करण्याबाबत प्रयत्न केले जातील. लाडकी बहीण योजना प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील १७ हजार अंगणवाडीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही सुनेत्रा पवार यांनी दिली.
