शहपूरात रानमेवा दाखल कैऱ्या,करवंद,तोरणं विक्रीसाठी दाखल आदिवासींना मिळाला रोजगार

ठाणे प्रतिनिधी

करवंद,जांभळं,कैऱ्या,तोरणं ,हा दाट जंगलात मिळणारा उन्हाळ्यातील खास रान मेवा विक्रीसाठी आता आदिवासी शहापूर बाजारपेठेत दाखल झाले आहेत.या रानमेवा विक्रीतून स्थानिक आदिवासी महिलांना रोजगार मिळाला आहे .

शहापूर तालुक्यातील वासिंद किन्हवली,शेणवा, डोळखांब,खर्डी,कसारा या परिसरातील दऱ्याखोऱ्यांत वास्तव्य करणारे आदिवासी जंगलात भटकंती करुन करवंद ,कैऱ्या,तोरणं आदी रानमेवा गोळा करुन उन्हाळ्यात

शहरात विक्रीसाठी घेऊन येतात हा रानमेवा मिळविण्यासाठी पहाटेच आदिवासी घराबाहेर पडतात जंगलात जमा केलेला हा रानमेवा एका टोपलीत भरुन नंतर पळसाच्या द्रोणात ठेवून विक्रीसाठी शहरात आणला जातो ऊन्हाळ्यातच मिळणारा हा दुर्मीळ असा रानमेवा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते आहे.१० ते २० रुपये वाटा याप्रमाणे कैऱ्या,करवंद,तोरणं,यांची विक्री केली जाते या रानमेव्याच्या विक्रीतून पुर्ण दिवसभरात २०० ते ३०० रुपयांची कमाई होते असे सुकरी भला या आदिवासी महिलेने सांगितले हा रानमेवा शहापूरसह कल्याण,डोंबिवली,ठाणे,येथील बाजारपेठेत आदिवासी विक्रीसाठी आणतात या रानमेव्यामुळे उन्हाळ्यातील तीन महिने आम्हाला रोजीरोटी मिळत असते असे या व्यवसायातील आदिवासी सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *