खासदार नरेश म्हस्के वाढदिवशी प्रत्यक्ष भेटणार नाहीत

सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम राबविण्याचे आवाहन

नवी दिल्ली – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दु:खद निधन झाल्याने शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे संसदेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही. या आदर्श निर्णयाचे अनुकरण करत  खासदार नरेश म्हस्के यांनीही आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवारी, २४ मार्च रोजी खासदार नरेश म्हस्के यांचा वाढदिवस आहे. कार्यकर्ते, हितचिंतक, मित्र परिवार दरवर्षी मोठ्या जल्लोषात खासदार नरेश म्हस्के यांचा वाढदिवस साजरा करतात. मात्र यंदा आपल्या नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकत   खासदार नरेश म्हस्के यांनी  आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

खासदार नरेश म्हस्के यांना दरवर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, हितचिंतक हारतुरे घेऊन प्रत्यक्ष भेटीसाठी येत असतात. संसदेचे अधिवेशन सुरु असल्याने खासदार नरेश म्हस्के हे दिल्लीत असून वाढदिवशी  प्रत्यक्ष ठाण्यात कोणालाही भेटू शकणार नाहीत. वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम राबविण्याचे आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता असल्याने कार्यकर्ते, हितचिंतक वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ऊर्जा देत असल्याने त्यांचा स्वीकार करत खासदार नरेश म्हस्के यांनी कार्यकर्ते, हितचिंतकांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *