तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल

रमेश औताडे

मुंबई : डॉ.आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळे सर्वांसाठी खुले करून समानतेचा ऐतिहासिक लढा उभारला होता. मात्र आजही सामान्य नागरिकांना पाण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी हा मूलभूत हक्क आहे त्यामुळे शासनाने पाणी सर्वांसाठी मोफत केले तरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली शासनाकडून वाहिली गेली असे सिद्ध होईल. असे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सांगितले.

प्रदेश प्रवक्ते धर्माजी बागडे, भोजराज वैद्य, प्रमुख पाहुणे धर्माजी बागडे, जयदेव चिंवडे, प्रकाश कांबळे, प्रविण आवळे सूत्रसंचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले.पुण्यशील बोदिले.अभिषेक मिश्रा, रोहित पांडे, राहूल द्विवेदी सतिश शुक्ला ,पवन वर्मा,शिबू पांडे, सुरेंद्र तिवारी अतुल गंगापूरकर उपस्थित होते. नारायण बागडे यांनी असे अनेक उपक्रम राबवत शासनाला वेळोवेळी सूचना केल्या आहेत. मात्र सरकार या सूचना अंमलात आणत नाही. याचे मोठे दुःख आहे असे धर्माजी बागडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *