प्राथमिक आरोग्य केंद्रातील पथकाचे डॉ. ठरले गोरगरीबांसाठी देवदूत
राजीव चंदने
मुरबाड : तालुक्यातील अतिदुर्गम भागात आरोग्य देवदूत म्हणून डॉ. वर्षा तंत्रपाळे यांनी स्वतःची आगळीवेगळी ओळख निर्माण केली असल्याचे तेथील काही गरीब आदिवासी आणि जानकरां मधे सध्या चर्चा केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी मोधलवाडी या आदिवासी वस्तीतील पिंटू विठ्ठल भला वय ५ महिने या बाळाच्या छातीमध्ये पॉईंझन झाल्याकारणाने त्याला त्याच्या आई वडिलांनी अनेक हॉस्पिटल मध्ये दाखवून सुद्धा कुठलाही फरक पडला नाही. शेवटी बाळाला देवाच्या भरवशावर सोडून देतो असे निशब्द वाक्य आई वडीलांनी आपल्या काळजावर दगड ठेवून काढले. आता पुढे जे काही होईल ते आमच्या नशिबाने होईल असे बोलत त्यांनी आपल्या बाळाला घरीच ठेवले, वैद्यकीय मदत पथक धारखिंड येथील डॉ. वर्षा ओंकार तंत्रपाळे यांना सदरील बातमी समजता त्यांनी बाळाचे आई वडील यांना विश्वासात घेऊन त्यांना आधार दिला व बाळाला उपचार करण्यासाठीचे सर्व सुत्रे आपल्या हाती घेऊन
बाळाला हॉस्पिटलला ऍडमिट करण्यासाठी राहत्या घरी मोधलवाडी येथे रुग्णवाहिका घेऊन स्वतः गेल्या तेथे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांच्या मदतीने बाळाला अंबरनाथ येथे छाया हॉस्पिटल तेथून उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटल येथे बालरोग तज्ञांना दाखवण्यासाठी नेले. सेंट्रल हॉस्पिटल येथील बालरोग तज्ञ डॉ.वैशाली पवार आणि डॉ. ऐश्वर्या मोरे यांनी प्राथमिक उपचार देऊन बाळाला पुढे सायन हॉस्पिटल मुंबई येथे संदर्भित करण्यात आले. तिथे काही महिने ऍडमिट ठेवून घरी पाठवण्यात आले. या सर्व प्रकारांमध्ये उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटल येथील आर. बी. एस. के. चे वैद्यकीय अधिकारी डॉ. शालिनी मोहोड यांचे मौल्यवान सहकार्य लाभले, आदिवासी दुर्गम भागामध्ये वैद्यकीय मदत पथकाचे मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा तंत्रपाळे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आमच्या बाळाचा जीव वाचल्याचे आई वडीलांनी मोठ्या अंतःकरणाने दैनिक बित्तंबातमी शी बोलताना सांगितले.
