दिवसा तारे आठवले ० शक्ती गेल्याचा आलाप ० चेहरा लपवला

नाशिक : भोंदूगिरीच्या जोरावर महाराष्ट्रातील महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या कॅप्टन उर्फ अशोक खरातला पोलिसांनी थर्ड डिग्री दिली. अटकेनंतरही तोऱ्यात चालणाऱ्या अशोक खरातला स्वताच्या पायावरही उभे राहणे अवघड झाले होते. पोलिसांचा आधार घेत त्याला जीपपर्यंत जावे लागेल. पोलिसांच्या थर्डडिग्रीनंतर सर्व शक्ती गेल्याचा आलाप अशोक खरात करीत होता. इतकेच नव्हे तर पोलिसांच्या जीपमध्ये बसल्यावर आपले तोंडही लपवित होता.

दरम्यान, अनेक बढ्या राजकीय नेत्यांची सिक्रेट अशोक खरातकडे असल्यामुळे त्याचा पोलिस एन्काऊंटर करतील असा आरोप पण्यातीली सामाजिक कार्यकर्यात्याने केला आहे.

दरम्यान, नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात  प्रकरण सध्या गाजत असून विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही याच प्रकरणावर सभागृहात चर्चा होण्याची शक्यता आहे. अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो असल्याने राजकीय पक्षनेतृत्वावरच प्रश्न उपस्थित होत असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनाही याप्रकरणात आपला राजीनामा द्यावा लागला आहे.

अजित पवारांच्या अपघाताशी

खरातचे कनेक्शन ?- मिटकरी

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी  यांनी अजित पवारांच्या अपघाताचे कनेक्शन तर नाही ना, म्हणत प्रश्न उपस्थित केले आहेत. नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली होती, अशी माहितीही मिटकरी यांनी दिली.

अशोक खरातच कृत्य महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळीमा फासणार आहे, आपला भांडाफोड होणार हे अशोक खरातला माहित झालं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी लुकआउट नोटीस काढल्याने तो पळून गेला नाही. व्हीएसआर कंपनीच्या मालकासोबत या भोंदूबाबाचे संबंध असू शकतात. कारण, या प्रकरणात अनेक राजकीय लोकांचे धागेदोरे असून सप्टेंबर महिन्यात करंगळी कापण्याचा झालेला प्रकार सर्वात अघोरी असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली, अशोक खरात आणि अजित दादांचा अपघात याच्यात संबंध आहे का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला असून गेल्या तीन दिवसापासून अजित दादांचा विषय मागे पडलाय. जितक्या तत्परतेने अशोक खरात पकडला तशीच तत्परता अजित दादांचा प्रकरणात झाली पाहिजे, अशी मागणीही मिटकरी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *