मध्य रेल्वे तिकीट चेकिंग परिवाराचा हिंदू नववर्ष स्वागत सोहळा उत्साहात

मुंबई : मध्य रेल्वेच्या “तिकीट चेकिंग परिवार”तर्फे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला १८ मार्चला माटुंगा (पूर्व) येथील मध्य रेल्वे ऑफिसर्स क्लब हॉलमध्ये हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रा व वर्षभर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तिकीट चेकिंग स्टाफचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. श्री गणेश मंदिरात पुष्पहार अर्पण करून बाप्पाचे आशीर्वाद घेत शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. भगवे फेटे परिधान केलेल्या कर्मचाऱ्यांनी वरळी कोळीवाड्यातील प्रसिद्ध बँड व तुतारीच्या तालावर सहभाग नोंदवला.

या शोभायात्रेत DY CCM दीपक शर्मा, पीआरओ मायकल राज तसेच जीवन गौरव पुरस्कार विजेते सुनील कुमार बी. सहभागी झाले होते. कार्यक्रमात विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना, मुंबई SRDCM शिवराज मानसपुरे यांच्या उपस्थितीत वर्षभर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३५ तिकीट चेकिंग कर्मचाऱ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच SRDCM-Works प्रकाश कनोजिया, DCM अजय कुमार, ACM-TC पंकज कुमार, CTI-ML सुदेश वेनोल्लू आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

उत्कृष्ट टीसी कार्यालय म्हणून पनवेल CTI ऑफिस व भायखळा CTI ऑफिसचा सन्मान करण्यात आला. निवृत्त DCTI सुनील कुमार बी. यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी ASI-RPF सौ. शोभा मोटे व भरारी फेडरेशनच्या अध्यक्षा सौ. स्नेहाताई भालेराव यांचाही सत्कार झाला. कार्यक्रमाला DY CCM आर.बी. दीक्षित, RTD ACM सौ. किरण वर्मा, RTD DCTI एन.बी. सकपाळ, प्राध्यापक अमेय महाजन, पत्रकार राजेश कुमार पंड्या, फिरोज भाई (लाईफ ओके), कोकण रेल्वेचे प्रदीप शिर्के व पश्चिम रेल्वेचे शेलार उपस्थित होते.

तिकीट चेकिंग परिवाराचे अध्यक्ष संजय (भाई) आंग्रे, कार्याध्यक्ष श. राजन सुर्वे, सचिव डी.व्ही. चिंदरकर, हरिश मोंडकर, खजिनदार शेखर तांबे, गिरीष कदम, संदीप मोडक, दीपक पापन, अभय कांबळे, अरुण परब, सचिन सावंत, रविंद्र बिरवटकर, विकास पाटील, प्रमोद मोरे, प्रसाद करलकर, नवनीत नाखवा, अनिल करोसिया, ओंकार बागवे, रोहिणी राणे, प्रज्ञा कुलकर्णी, सुधा नायर, लिना गोरडे, चित्रा मयेकर, शुभदा कुलकर्णी, अर्चना खाटपे, अनुष्का गोली, पल्लवी सावरकर व नीलिमा ठाकूर यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.

सांस्कृतिक कार्यक्रमात श्रद्धा साळुंखे, महालक्ष्मी, स्वाती पाटील, सुरक्षा उदीयार, कस्तुरी मोरे, केतकी कदम, संगीता काळभोर, प्रीती सिंग, लिस्सा राणी, राजेंद्र त्रिभुवन तसेच बालकलाकार जननी ठाकूर, आरव काळभोर, उदिता उतेकर यांनी सहभाग घेतला. नृत्य दिग्दर्शक राकेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम रंगला. “सुर झंकार”चे रामाकृष्ण गवळी, सुचिता भानुशाली, एन.डी. मोरे, शशांक सत्तूर, विकास मिश्रा यांनी गायन सादर केले तर सूत्रसंचालन डी.व्ही. चिंदरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *