ठाणे : पुण्यात ,वाघोली येथे संपन्न झालेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील पैलवान व क्रांतीअग्रणी जी.डि बापू लाड मिशन ऑलिंपिकचा  दत्तक मल्ल सूरज माने याने नेत्रदीपक कामगिरी बजावत रौप्य पदकाची कमाई केली.
सूरज माने याने ७९ किलो वजनी गटात महाराष्ट्र केसरी मध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत त्याने  पहिल्या फेरीत  बुलढाण्याच्या शुभम आवरेला   आरामात नमवले.दुसऱ्या फेरीत देखील त्याने छ.संभाजी नगर च्या चरण मेघवालवर सहज विजय मिळवता. तिसऱ्या फेरीत सूरजने  कोल्हापूरच्या पृथ्वीराज बोडकेला‌ ५-२ गुणांनी पराभुत केले. चौथ्या फेरीत सुरजने  सोलापूर शहरचा  तगडा मल्ल गोपीनाथ सुतारला  शेवटच्या दीड मिनिटा मध्ये आक्रमक खेळा चे प्रदर्शन करत चार गुणांच्या फरकाने पराभुत  करुन  अंतिम सामन्यात प्रवेश केला .
अंतिम सामन्यात मात्र सोलापूर जिल्ह्याच्या विकास करेने सुरजला पराभुत करुन सुवर्ण  पदक जिंकले. सुरजला   रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या समक्ष त्याला पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे ,.रामकृष्ण सातव पाटील यांच्या तर्फे स्प्लेंडर मोटार सायकल भेट देऊन सूरज चा गौरव करण्यात आला.
राज्यस्तरावरील सूरज चे हे दुसरे पदक आहे , सूरज सध्या अभिनव कॉलेज मध्ये कला शाखेतील तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. त्याला आखाड्याचे सर्वेसर्वा .वसंतराव पाटील व कुस्ती प्रशिक्षक पै.वैभव माने यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *