श्रीविश्वेश्वर सहकारी पतपेढीला आदर्श पतसंस्था पुरस्कार प्राप्त

राजेंद्र साळसकर

मुंबई : सहकार क्षेत्रातील राज्यस्तरीय विस्तारलेली तसेच तेली सेवा समाज संस्थापित श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई या पतसंस्थेला आदर्श पतसंस्था पुरस्कार -२०२५ ने नुकतेच सन्मानित कण्यात आले.या पतसंस्थेला रूपये २५ ते ५० कोटी आर्थिक उलाढाल असलेल्या गटामधून सन २०२४ -२५ या आर्थिक वर्षासाठी द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य बिगर कृषि सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.,मुंबई यांच्या विद्यमाने आदर्श पतसंस्था पुरस्कार -२०२५ हा पुरस्कार सोहळा  सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील , पाचगणी रोडवरील “क्लाऊड मिस्ट हॉटेल”, येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या सोहळ्यामध्ये श्री विश्वेश्वर सह. पतपेढीचा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे आयुक्त अनिल कवडे,मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक  तसेच बृहन्मुंबई नागरी सह. पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई चे अध्यक्ष शिवाजीराव नलावडे, महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था ,पुणे दिपक तावरे तसेच महाराष्ट्र राज्य बिगर कृषि सह.पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई या संस्थेचे अध्यक्ष जिजाबा पवार आदि मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.

पतसंस्थेच्यावतीने अध्यक्ष दिलीप केळंबेकर, खजिनदार किशोर रसाळ, संचालक सदस्य लऊ सकपाळ, प्रमोद सातार्डेकर, अनिल राऊत,कमलाकर शेलार, मुख्य व्यवस्थापक दर्शन राऊत यांनी हा सन्मान स्विकारला. तसेच या दैदिप्यमान सोहळ्यास विविध पतसंस्थांचे संचालक मंडळ सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. पतसंस्थेचे सभासद, ठेवीदार कर्जदार व हितचिंतक या सर्वांच्या बहुमुल्य सहकार्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे तसेच सदर पुरस्कार म्हणजे आपल्या सर्व सभासदांचा सन्मान आहे,अशी भावना पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप केळंबेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *