मंडगाव, गोवा येथे सुरू असलेल्या  ४८वी भारतीय मास्टर राष्ट्रीय बॅडमिंटन २0२५-२६ स्पर्धेत  ६५ वर्षावरील मिश्र दुहेरी गटात  दिलीप सुखटणकर व सावित्री मोहन यांना “” कास्य पदक “” मिळाले.  त्यांनी उपउपांत्य फेरीत मणके राम चौधरी व शकुंतला उज्जैना यांना २१-११ व २१-१५ असे हरविले तर उपांत्य फेरीत त्यांना बनटिवाल सुनील  व शोभा विजयन यांच्या कडून १७-२१, २१-१९ व २१-१७. अशा अत्यंत चुरशीच्या  मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *