अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धा
खालसाचे तायक्वांडोपटू चमकले
मुंबई : जालंधर (पंजाब) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेत किंग सर्कल येथील गुरु नानक खालसा कॉलेजच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना तीन कास्य पदकांची कमाई केली. या अ.भा. आंतरविद्यापीठ स्पर्धेत देशभरातील २३४ विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता, तर एक हजारपेक्षा जास्त खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता.
खालसा कॉलेजच्या आर्यन येवलेने ६८ किलो वजनी गटात, तर ८० किलो खालील वजनी गटात निहाल भोईरने आणि ओम कदमने आपली छाप पाडताना कांस्य पदके मिळवली. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या सामन्यांमध्ये यांना निसटता पराभव पत्कारावा लागला. अन्यथा त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश पक्का होता. या तिघांना प्रशिक्षक राजेश मुरव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रत्ना शर्मा यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे खास अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका जसवीर कौर यांनी देखील खेळाडूंच्या या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.
