बोरीवली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
असंख्य नागरिकांनी घेतला लाभ
मुंबई, (प्रतिनिधी ) : श्री साईधाम सेवा समिती, देवीपाडा, बोरिवली (पूर्व) येथे श्री राम नवमी निमित्त या विभागातील नागरिकांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत आरोग्य शिबिरात वैद्यकीय चिकित्सा करण्यात आली. कांदिवली पूर्व येथील साईबाबा हॉस्पिटलच्या सौजन्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. नर्सिंग ऑफिसर सौ. नीता सिद्धेश नाईक यांनी आयोजक या नात्याने मार्गदर्शन केले. मधुमेह, रक्तदाब, ई. सी. जी., महिलांच्या आरोग्य समस्या व गर्भधारणा बद्दलचा सल्ला फिस्टुला, स्टोन, अपेन्डिक्स लहान मुलांना शाळेसाठी ब्लड ग्रुप व इतर अन्य तपासणी करण्यासाठी
डॉ. श्रद्धा गांधी (एम. डी. फिजिशन), डॉ. जयश्री खोपकर (स्त्रीरोगतज्ञ), डॉ. पूजा तिवारी (लेप्रोस्कोपी सर्जन) यांच्या मार्गदर्शनाखाली चिकित्सा करण्यात आल्या. लॅब टेक्निशियन दिलीप नाटेकर. प्रकाश सहारे. साई मुरली केमिस्ट परीन पटेल, कुशल शाह, भारती पन्हाळे, (सिस्टर) प्रतीक्षा हंकारे, पूजा भोसले, गणेश कोणार, चेतन शिंदे यांच्या पथकाने हे शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
