मुंबई इंडियन्सचे बँकिंग भागीदार उत्कर्ष स्मॉल फायनान्स
रमेश औताडे
मुंबई : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (उत्कर्ष एसएफबीएल) टी-२० २०२६ च्या लीगसाठी ‘ मुंबई इंडियन्स ‘ चे अधिकृत बँकिंग भागीदार म्हणून निवड झाली असून बँकेने या महत्वपुर्ण भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीच्या माध्यमातून बँक आपली राष्ट्रीय स्तरावरील ओळख वाढवण्याबरोबरच देशभरातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांशी आपले नाते अधिक दृढ करत आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद सिंग, मुख्य वित्त अधिकारी सरजुकुमार प्रवीण सिमारिया आणि कन्झ्युमर बँकिंग प्रमुख सौरभ घोष तसेच मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या भागीदारीचा एक भाग म्हणून, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे चे उद्दिष्ट विविध ग्राहक वर्गांशी आपला संवाद आणि सहभाग वाढवणे, तसेच या हंगामादरम्यान राबवल्या जाणाऱ्या एकात्मिक मार्केटिंग उपक्रमांद्वारे व इतर नियोजित कार्यक्रमांद्वारे आपल्या ब्रँडची उपस्थिती करणे आहे.
