एनआयए मनोज रामचंद्र बॅडमिंटन स्पर्धा २६ मार्चपासून

मुंबई, २४ मार्च: महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने आणि नॉर्थ इंडियन असोसिएशन आणि जितेश पदुकोण अकादमीद्वारे आयोजित ‘योनेक्स सनराईज मनोज रामचंद्र स्मृती राज्यस्तरीय खुली बॅडमिंटन स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून खेळली जाणार आहे.

या स्पर्धेत ३६० हून अधिक प्रवेशिका आल्या असून ही स्पर्धा पुरुष आणि महिला एकेरी तसेच १५ आणि ११ वर्षांखालील मुले आणि मुली एकेरी गटांमध्ये खेळवली जाईल. हे सामने नॉर्थ इंडियन असोसिएशन, एमआयजी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि माटुंगा जिमखाना येथील कोर्टवर खेळले जातील.

पुरुष आणि महिला एकेरीतील विजेत्यांना प्रत्येकी रोख ४१,००० रुपये तर उपविजेत्याला प्रत्येकी रोख ३१,००० रुपये बक्षीस मिळेल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २१,००० आणि ११,००० रुपये मिळतील. १५ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या एकेरी गटातील विजेत्याला ८,५०० रुपये, उपविजेत्याला ५,५०० रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला ३,५०० रुपये असे  बक्षीस ठेवण्यात आले आहे. १५ वर्षांखालील गटासाठीची पारितोषिके संदीप ठाकर यांनी त्यांचे पुत्र निहार ठाकर यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली आहेत. ११ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या एकेरी गटातील विजेत्यांना प्रत्येकी ६,००० रुपये रोख बक्षिसे मिळतील तर उपविजेत्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला प्रत्येकी ४,००० आणि २,५०० रुपये मिळतील. अधिक माहितीसाठी आयोजन सचिव जितेश पदुकोण (९८२१० ५१७९०) यांच्याशी संपर्क संपर्क साधा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *