एमसीसी प्रो-४० क्रिकेट लीग २०२६
एमसीसी ब्ल्यू संघाचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय
मुंबई, २४ मार्च: ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन (जेएसएफ) आयोजित एमसीसी प्रो-४० क्रिकेट लीग २०२६ स्पर्धेत (एलिट ग्रुप) एमसीसी ब्ल्यू संघाने ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन (जेएसएफ) संघावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मात केली.
एमसीसी ब्ल्यू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४७ षटकांत २३९ धावांची मजल मारली. त्यात झैद मुफ्ती ८७(७३) आणि शौर्य वीर नगरचे ६१(९२) सर्वाधिक योगदान राहिले. जेएसएफकडून निशार्ग चौधरी (५/४५) आणि देव जम्मुला (३/५१) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले.
हर्षल वाघमारे (४/३०), हृद्या (२/१९) आणि अफसर अहमदच्या (२/३७) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर जेएसएफचा पहिला डाव ४०.३ षटकांत १५० धावांमध्ये आटोपला. त्यांच्याकडून मुहम्मद इब्राहिम ५५(८८) आणि देव जम्मुला २७(२७) सर्वाधिक धावा केल्या. पहिल्या डावातील ८९ धावांची आघाडी एमसीसी ब्ल्यू संघासाठी निर्णायक ठरली.
एमसीसी ब्ल्यू संघाने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३० षटकांत ७ बाद १९८ धावा केल्या. यांच्याकडून दियान कुबाडिया ५०(४६) आणि डॅलरॉन रॉड्रिग्जने ४३(३४) चांगली फलंदाजी केली. जेएसएफकडून निशार्ग चौधरीने (५/४९) अचूक मारा केला.
पराभूत जेएसएफचा अष्टपैलू निशार्ग चौधरीला (संपूर्ण सामन्यात १० विकेट) सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक: एमसीसी ब्ल्यू संघ (पहिला डाव) – ४७ षटकांत सर्वबाद २३९(झैद मुफ्ती ८७(७३), शौर्य वीर नगर ६१(९२); निशार्ग चौधरी ५/४५, देव जम्मुला ३/५१). दुसरा डाव – ३० षटकांत ७ बाद १९८(दियान कुबाडिया ५०(४६), डॅलरॉन रॉड्रिग्ज ४३(३४); निशार्ग चौधरी ५/४९).
जेएसएफ (पहिला डाव) – ४०.३ षटकांत सर्वबाद १५०(मुहम्मद इब्राहिम ५५(८८), देव जम्मुला २७(२७); हर्षल वाघमारे ४/३०, हृद्या २/१९, अफसर अहमद २/३७). निकाल: सामना अनिर्णित, एमसीसी ब्लू संघ पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजयी. सामनावीर: निशार्ग चौधरी १२(२७) ५/४५ आणि ५/४९.
