कल्याण : शालांत परीक्षा संपल्यानंतर मुलांना सुट्ट्यांचे वेध लागतात. दहावीची परीक्षा संपल्यानंतर पिकनिक, वॉटर रिसॉर्ट, मोबाईल, कम्प्युटर गेम यापासून दूर जात  काही मुलांनी एकत्र येत महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर पार करण्याची मोहीम आखली. यासाठी गिर्यारोहक आणि प्रशिक्षक प्रदीप नायक यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत लोक कल्याण पब्लिक स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच ही मोहीम फत्ते केली.
महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्या मध्ये असणारे सर्वोच्च शिखर (१६४६ मी/५४०० फूट उंच ) ज्याला महाराष्ट्र चा एव्हरेस्ट मानले जाते. मुलांनी सायंकाळी शिखराकडे कूच केल्यानंतर मध्ये अनेक अडचणी आल्या. विद्यार्थ्यांचा हा पहिलाच प्रयत्न होता. या सर्वांवर मात करत सकाळी ६ वाजता शालेय विद्यार्थ्यांनी कळसुबाई शिखर सर केले. या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि पहिल्यांदाच केलेला कामगिरीचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता.  या टीम मध्ये स्केटिंगची राष्ट्रीय खेळाडू आस्था नाइकर, तीर्था पणिकेर, दिशिता खाचणे, हर्षिल सोळंकी, धनराज सावंत, सार्थक घोडेस्वार, श्रेया प्रसाद, श्लोक बोंबाटकर,
शोभित लोखंडे, सई देशमुख, अमेय सोरकाडे, यश भोर,
रणबीर प्रसाद, श्रावणी बांदेकर, कृष्णा पाणीग्रही, तृषा खराडे, पार्थ दाभाडे, मनस्वी ढेंगरे, विरेन वानखेडे, अथर्व कदम, वेदिका देवळेकर, मनस्वी फुटाणे, आर्या गुरव आणि प्रशिक्षक प्रदीप नायक यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *