युनियन क्रिकेट अकॅडमीतर्फे मुलींसाठी ओपन एज निवड चाचण्या जाहीर

मुंबई :: युनियन क्रिकेट अकॅडमीतर्फे मुलींसाठी ओपन एज निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आले असून, इच्छुक महिला क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा दाखवण्याची आणि नॉकआउट स्पर्धेसाठी संघात स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या निवड चाचण्या २७ मार्चला सायं. ४ते  ६ वाजेपर्यंत, युनियन क्रिकेट अकॅडमी, कल्याण येथे पार पडतील. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणे आणि नवोदित खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. निवड झालेल्या खेळाडूंना आगामी नॉकआउट स्पर्धेत अकॅडमीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.

पात्रता: – सर्व वयोगटातील मुलींसाठी खुले क्रिकेटची आवड असणे आवश्यक, सोबत आणावयाच्या वस्तू,  संपूर्ण क्रिकेट किट, स्पोर्ट्स शूज, पाण्याची बाटली

निवड निकष: – खेळातील कामगिरी- फिटनेस- शिस्त – खेळाची समज

अकॅडमीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी योग्य संधी देणे हा आमचा उद्देश आहे. इच्छुक खेळाडूंनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा.” अधिक माहितीसाठी ९९६८८५६७८८ या क्रमांकावर संपर्क साधा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *