बंद असलेल्या बसेस ची वाहतूक पुन्हा सुरु करा
शिवसेनेची मागणी
मुंबई: देवीपाडा व जय महाराष्ट्र नगर, टाटा विद्युत संग्राही केंद्र, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील नागरिकांसाठी असलेली मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) बस क्र.२९९ व बस क्र. २९3 या बेस्टची बंद असलेली सेवा पुन्हा पूर्ववत सुरु करण्यात यावी अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा १२ व १४ च्या वतीने करण्यात आली. ही बंद असलेली सेवा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांनी मागाठाणे डेपो प्रमुख जितेंद्र सामंत यांना भेटून लोकांच्या समस्या सविस्तर सांगितल्या व मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मागाठाणे विधानसभा निरीक्षक, सिनेट सदस्य शशिकांत झोरे, मागाठाणे विधानसभाप्रमुख रेखाताई बोऱ्हाडे, उपविभागसंघटक सिमीतिनी नारकर, वैभवी तावडे, शाखाप्रमुख सचिन मोरे, माधुरी खानविलकर, वनिता दळवी, प्रतीक चव्हाण, दिनेश विचारे, मूर्तिकार नंदकिशोर शिवलकर, विजया गायकवाड, सीमा सानप, मंगल करडे, कौस्तुभ खानविलकर उपस्थित होते.
