पेंढारकर कॉलेज व सिस्टर निवेदिता स्कूल प्रकरणी चौकशीची मागणी
कल्याण: डोंबिवलीतील के. व्ही.  पेंढारकर कॉलेज व सिस्टर निवेदिता स्कूल तसेच संबंधित ट्रस्टच्या कार्यपद्धतीबाबत विविध गंभीर प्रश्न समोर येत असून, या संदर्भात निष्पक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी ‘Save Education Society’ अंतर्गत साखळी उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरण प्रक्रियेतील अनियमितता, विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कासंदर्भातील प्रश्न, ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांमधील पारदर्शकतेचा अभाव, तसेच शैक्षणिक संस्थांच्या वापराबाबत निर्माण झालेल्या शंका या मुद्द्यांवर लक्ष वेधण्यात येणार आहे. या सर्व बाबींवर संबंधित प्राधिकरणांकडून सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
हे साखळी उपोषण गुरुवार, २६ मार्च  रोजी के.व्ही. पेंढारकर कॉलेज समोर आयोजित करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व रोहिदास सुरवसे करत असून, हा लढा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी व शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *