हवामान बदलचा सामना करत समुद्री शेवाळ शेतीचा प्रयोग

रमेश औताडे

मुंबई: हवामान बदलामुळे मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील जनतेच्या बेरोजगारीवर झाला आहे. यावर उपाय म्हणून समुद्री शेवाळ शेतीचा प्रयोग करण्यात येत आहे. पर्यावरण बिघडले असले तरी माणसाला नवीन संधी मिळत असून उदरनिर्वाह करण्याची नवनवीन प्रयत्न यशस्वी होत आहेत.

डीपी वर्ल्डचा सागरी सेवा व्यवसाय असलेल्या शिपिंग सोल्यूशन्स एएमईए यांच्या नेतृत्वाखालील हा उपक्रम इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज (आयएनईसीसी) आणि क्लाइमाक्रू यांच्या भागीदारीत राबवला जात आहे. डीपी वर्ल्डच्या शिपिंग सोल्यूशन्स एएमईए-मरीन सर्व्हिसेसचे प्रादेशिक संचालक-भारत सी. एम. मुरलीधरन म्हणालेः “हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सागरी शैवाल शेती किनारपट्टीवरील समुदायांना लवचिक उपजीविका देते.

उदयोन्मुख नील अर्थव्यवस्थेचा एक भाग म्हणून समुद्री शैवाल लागवडीला जागतिक स्तरावर वाढत्या प्रमाणात मान्यता मिळाली आहे. त्यामुळे हवामान अनुकूलन आणि परिसंस्थेचे पुनरुत्पादन या दोहोंना आधार देणारी कमी परिणाम करणारी सागरी उपजीविका उपलब्ध होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *