जैन इरिगेशन ब संघाची मुंबई पोलीस ‘अ’ संघावर मात
मुंबई :  राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर कंपनी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक आरसीएफ टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत जैन इरिगेशन ब संघाने ग्रेटर मुंबई पोलीस एससी अ संघाचा १५ धावांनी पराभव केला.
मुंबई पोलीस एससी अ संघाने नाणेफेक जिंकून जैन इरिगेशन ब संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यांनी २० षटकांत ८ बाद १४३ धावा केल्या. त्यात विलोहित देसाईने सर्वाधिक (५४ धावा, ४७ चेंडू, ४ चौकार, १ षटकार) योगदान दिले. त्याला अनिरुद्ध नायरची (३९ धावा, ३१ चेंडू, ५ चौकार, १ षटकार) चांगली साथ लाभली. मुंबई पोलीस संघाकडून योगेश पाटीलने (४/२९) प्रभावी गोलंदाजी केली.
ग्रेटर मुंबई पोलीस संघाला प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव १८.४ षटकांत १२८ धावांमध्ये आटोपला. त्यांच्याकडून योगेश पाटील (३५ धावा, २२ चेंडू, ४ चौकार, २ षटकार) आणि हर्ष साळुंखेने (२५ धावा, ९ चेंडू, ३ चौकार, २ षटकार) छान फटकेबाजी केली तरी सोहम सबनीस (२.४-०-१३-३) आणि हर्षल वाघमारेच्या (४–०-२४-२) अचूक माऱ्यासमोर अन्य फलंदाजांचा टिकाव लागला नाही.
योगेश पाटील याला सामनावीर म्हणून प्रमुख पाहुणे महेंद्र अग्रवाल (ईडी-वित्त) यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक; जैन इरिगेशन ब संघ – २० षटकांत ८ बाद १४३(विलोहित देसाई ५४, अनिरुद्ध नायर ३९; योगेश पाटील ४/२९) वि. ग्रेटर मुंबई पोलीस एससी अ संघ – १८.४ षटकांत सर्वबाद १२८ (योगेश पाटील ३५,  हर्ष साळुंखे २५; सोहम सबनीस २.४-०-१३-३, हर्षल वाघमारे (४–०-२४-२). निकाल: जैन इरिगेशन ब संघ १५ धावांनी विजयी. सामनावीर : योगेश पाटील.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *