रोटरी क्लब कॅरम स्पर्धा
रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जुहू यांच्या सहकार्याने प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या ६ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम एकतर्फी झाला. माजी विश्व् विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेने ठाण्याच्या संजय मांडेचा २५-१०, २५-५ असा धुव्वा उडवत विजेतेपद काबीज केले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या रहिम खानाने रंगतदार लढतीत आपल्या अनुभवाच्या जोरावर उदयोन्मुख मुंबईच्या निलांश चिपळूणकरवर २१-२३, १५-१४ व २४-१४ असा विजय मिळवला. महिला एकेरी गटात अंतिम फेरीची लढत तीन सेटपर्यंत रंगली. या लढतीत मुंबईची सोनाली कुमारी सरस ठरली. तिने ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरवर १२-२५, २५-१० व २५-५ अशी मात करत आपल्या विजयाची नोंद केली. महिलांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत ऐशा साजिद खानने तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २०-२२, २४-५, २०-७ असा पराभव केला. सिस्का कंपनीच्या बुलेट शॉट कॅरम व सोंगट्यांवर प्रथमच झालेल्या या स्पर्धेत प्रशांत मोरे व सोनाली कुमारीने प्र्येकी रोख रुपये २५ हजारांची कमाई केली.
विजेत्यांना प्रमुख पाहुणे रोटेरियन दीपक जियांदानी नॉमिनी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ३१४१, रोटेरियन डॉक्टर दीपक मोंडकर अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर, रोटेरियन भालचंद्र बर्वे अध्यक्ष, ब्लू क्रॉस लॅबोरेटरीज, श्री मकरंद येडुलकर ट्रस्टी, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, श्री अरुण केदार मानद सचिव, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व श्री संतोष चव्हाण कार्याध्यक्ष, मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना यांच्या हस्ते विजेत्याना रोख पारितोषिके, प्रशस्तीपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. समारंभाचे सूत्र संचालन श्री सुशील देशपांडे यांनी केले.
पुरुष एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे.
संजय मांडे ( मुंबई ) वि वि रहिम खान ( पुणे ) १४-१८, २१-१४ व २२-१७
प्रशांत मोरे ( मुंबई ) वि वि निलांश चिपळूणकर ( मुंबई ) २४-५, २४-६
महिला एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे.
सोनाली कुमारी ( मुंबई ) वि वि मिताली पाठक ( मुंबई ) १६-७, २२-१६
सम्रुद्धी घाडीगावकर ( ठाणे ) वि वि ऐशा साजिद खान ( मुंबई ) १-२५, १८-१७ व २५-३
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *