बोरीवली येथील जनरल करिअप्पा  उड्डाणपुलाच्या  दुरुस्तीकरण कामाचे भूमिपूजन

सहा महिन्यांत नवीन पूल होणार उपलब्ध

मुंबई : बोरिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा जनरल करिअप्पा उड्डाणपूल हा बोरिवलीकरांसाठी सर्वात महत्त्वाचा दुवा समजण्यात येतो. सुमारे तीस वर्षांपूर्वी बांधलेल्या या पुलावरील पदपथ (फुटपाथ), कठडे (रेलिंग), तसेच या उड्डाणपुलावर असलेल्या प्रचंड वाहतुकीमुळे रस्त्यावर पडलेले खड्डे, वाहनचालकांना डोकेदुखी ठरत होते. आमदार संजय उपाध्याय यांच्या पुढाकाराने व निर्देशाने मुंबई महानगरपालिकेतर्फे या उड्डाणपुलाचे नूतनीकरण/दुरुस्तीकरण करण्याचा भूमिपूजन कार्यक्रम आमदार संजय उपाध्याय व मुंबई आर मध्य विभाग सहाय्यक आयुक्त डॉ. प्रफुल्ल दिनेश तांबे यांच्या उपस्थितीत आज पार पडला.

मुंबई महानगरपालिकेतर्फे आता या पुलाचे रोड सर्फेसिंग (पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण), रेलिंग व उखडलेले फुटपाथ तसेच पूर्व व पश्चिम दिशेला पुलावरून खाली उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत, त्यांची देखील दुरुस्ती करण्याचे काम लवकरच सुरू होईल. किमान सहा महिन्यांत हा पूल नव्याने उपलब्ध होणार आहे. हे काम होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमाला स्थानिक नगरसेविका ॲड्. सीमा शिंदे, नगरसेविका राणी द्विवेदी निघूट व माजी नगरसेवक विद्यार्थी सिंग, विधानसभा संयोजक  दिनेश झाला, भारतीय जनता पक्षाचे बोरिवली मंडळ अध्यक्ष देवसिंग, सुधीर परांजपे, विजयानंद पेडणेकर, प्रभाग अध्यक्ष धर्मवीर ठाकूर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी सहाय्यक अभियंता (पूल विभाग) स. वा. सोने, गडबाई व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *