लोकसभेत खासदार ५४३ वरून ८१६ होणार

नवी दिल्ली: लोकसभेत ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्यासंदर्भात होणाऱ्या विशेष अधिवेशनात घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार असून महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेचे चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन १६ ते १८ एप्रिल दरम्यान असे तीन दिवस वाढवण्यात आले आहे. यामुळे लोकसभेतील खासदारांची संघ्या ५४३ वरून ८१६ होईल.

अधिवेशनाच्या या तीन दिवसांत महिला आरक्षणाशी संबंधित ‘नारी शक्ती वंदन कायद्या’त सुधारणा करणारे विधेयक सरकार सादर करू शकते, ज्यामुळे लोकसभेतील जागांची संख्याही वाढेल. अशातच, राज्यातील खासदारांचे संख्याबळ ४८ वरून ७२ पर्यंत जाईल, असा अंदाज आहे. असं झाल्यास यातून राज्यातील खासदारांची संख्या २४ ने वाढणार आहे. तसेच विधानसभेचे संख्याबळ ४०० पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. महिलांसाठी ३३टक्के आरक्षण लागू झाल्यावर २७३जागा महिलांसाठी राखीव होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *